Lonavala : बंद घराचे कुलूप कापून एलईडी चोरला

एमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप एक्सा ब्लेडने कापून घरातील एलईडी टीव्ही चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 2) रात्री साडेदहा ते बुधवारी (दि. 3) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मावळ तालुक्यातील मोरवे येथे घडला.

सुनील निवृत्ती साठे (वय 38, रा. देवले, ता. मावळ) यांनी याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील घरगुती कामानिमित्त मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले. रात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराला लावलेले कुलूप एक्सा ब्लेडने कापले. कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील एलईडी टीव्ही चोरून नेला. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास सुनील घरी आले असता त्यांना घराचे कुलूप कापलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी घरात पाहिले असता घरातील एलईडी टीव्ही गायब होता. त्यावरून त्यांनी तात्काळ लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.