Bhosari News : लोहार समाजाचा स्नेहमेळावा भोसरीत उत्साहात

एमपीसी न्यूज – जीवनगौरव पुरस्कार वितरण, समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धा, रांगोळी व चित्रकला स्पर्धा, (Bhosari News) रक्तदान शिबिर, गीतगायन, नृत्य आणि खेळ पैठणीचा असे विविध कार्यक्रम उत्साहात झाले. निमित्त होते, प्रभू विश्वकर्मा जयंतीनिमित्त लोहार समाज बहुउद्देशीय संस्था आणि लोहार उत्सव समितीतर्फे भोसरीत आयोजित समाज मेळावा व प्रभू विश्वकर्मा पूजन महोत्सवाचे.

प्रभू विश्वकर्मा प्रतिमा पूजन व महाआरती करून प्रारंभ झाला. तत्पुर्वी ज्ञानाई महिला भजनी मंडळाने भजनसेवा केली. फकिरादलाचे प्रदेशाध्यक्ष सतीश कसबे, बारा बलुतेदार महासंघाचे पुणे जिल्हा सचिव संतोष कुमावत, बारामती लोहार समाज अध्यक्ष नितीन थोरात, आळंदी येथील विश्वकर्मा गाडी लोहार समाज धर्मशाळा अध्यक्ष दिलीप थोरात, उपाध्यक्ष बाळसाहेब थोरात, उत्सव समिती अध्यक्ष दत्तात्रय अंकुश, ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी कळसे, विवेकानंद सुतार आदी उपस्थित होते. संस्थेच्या कार्याचा आढावा अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी प्रास्ताविकातून घेतला.

Akurdi News : कुणाला पराजय करण्यासाठी नाही तर; स्वतः जिंकण्याकरिता खेळा – शकुंतला खटावकर

दौंड येथील साहित्यिक तानाजी ढगे यांचा लेखसंग्रह ‘झगरं’ आणि रंग व प्रॉमिस या कविता संग्रहांचे प्रकाशन झाले. नागपूर येथील डॉ. वसंत साळवणकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविले. पाच हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. (Bhosari News) मानपत्राचे वाचन प्रा. डॉ. रामदास लाड यांनी केले. ज्येष्ठ नागरिक आदिनाथ लोहार, सुमन दुधमल, बनाबाई लोहार, पार्वताबाई अंकुश, वंदना लोहार, लक्ष्मीबाई लाड यांचा सन्मान केला. सूत्रसंचालन पीतांबर लोहार यांनी केले.

करमणूक व पारितोषिक वितरण

विश्वकर्मा एंटरटेनमेंट निर्मित ‘कलाकार आपल्यातला’ हा मराठी, हिंदी गाण्यांचा आणि ‘खेळ पैठणीचा, औदुंबर भाऊजींचा’ हे कार्यक्रम झाले. त्यांचे संचालन अनुक्रमे वसंतराव पोपळघट व औदुंबर कळसाईत यांनी केले. महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी, समाज प्रबोधनकार प्रमिला भालके यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. तेजल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. रक्तदान शिबिरात 27 जणांनी रक्तदान केले.

लकी ड्रॉद्वारे काढलेल्या पैठणीच्या मानकरी रेखा अंकुश ठरल्या. चित्रकला स्पर्धेचे प्रायोजक अनुक्रमे महादेव चापाकानडे, कृष्णदेव रणसिंग व संजय पवार; रांगोळी स्पर्धेचे प्रायोजक अनुक्रमे निर्मला दाते, राजेंद्र हरिहर, सत्यवान माने आणि खेळ पैठणीचा प्रायोजक अनुक्रमे संजीव दाते, तानाजी पवार, (Bhosari News) राजेंद्र दाते होते. राजश्री हरिहर, भारती शेलार, रेखा लोहार, संगीता सूर्यवंशी, श्रद्धा लोखंडे, सुजाता टिंगरे, कुसूम दाते, कविता मोळे, पूनम हळीकर, संगीता थोरात, महेश हरिहर, मंगेश टिंगरे, दत्ता लोहार, गणेश लोहार, भिवसेन लोहार, गणेश पवार, रमेश माने, दत्ता पोपळघट, मदन हारहारकर, विजयकुमार सूर्यवंशी, मंगेश टिंगरे, संतोष मोळे, अमोल पवार, सत्यवान माने, अमोल पवार, कृष्णा मंचरकर, वसंत पोपळघट यांनी संयोजन केले.

विविध स्पर्धांचे पारितोषिक विजेते (अनुक्रमे)

घरगुती गणपती सजावट स्पर्धा ः राहुल पवार (चिखली), हर्षल दाते (भोसरी), संजय जवणे (थेरगाव); घरगुती गौरी सजावट स्पर्धा ः सपना हरिहर (चिखली), प्रियंका पवार (निमगाव केतकी), तन्वी पाठक (कात्रज), मीनाक्षी पवार (कासारवाडी); राज्यस्तरीय निबंध स्पर्धा (अनुक्रमे 1500, 1300 व 1100 रुपये रोख व स्मृतिचिन्ह) ः मनीषा भालके (साकूर), माधुरी थोरात (अकलूज), अनुराधा इघे (राहुरी); चित्रकला स्पर्धा (अनुक्रमे 2500, 2000, 1500 व स्मृतिचिन्ह)  कुणाल कळसाईत, श्रेया लोहार, आदित्य कांबळे; रांगोळी स्पर्धा (अनुक्रमे पैठणी, 2000, 1500 व स्मृतिचिन्ह) ः श्रेया लोहार, कुणाल कळसाईत, सारिका पोपळघट; खेळ पैठणीचा (अनुक्रमे पैठणी, ओव्हण, इंडक्शन कुकवेअर) ः पूजा शिरसाट, ऋतुपर्णा चव्हाण, माधुरी लोहार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.