Loksabha election 2024 : माझे तिकीट जरी कापले असले तरी मी फॉर्म भरणार – भावना गवळी

एपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून  शिवसेना (एकनाथ शिंदे गट) कडून भावना गवळी यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्या जागी हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी (Loksabha election 2024) देण्याचे ठरले असून त्या उद्या (दि.4 एप्रिल) रोजी अधिकृतपणे उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत.

LokSabha Elections 2024 : पिंपरी-चिंचवड शहरातील सनदी लेखापालांचा लोकसभा निवडणुकीत 100 टक्के मतदानाचा निर्धार

याबाबतची सविस्तर बातमी अशी की, भावना गवळी ह्या काही दिवसांपासून यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळावे म्हणून मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. त्या गेल्या  5 टर्मपासून त्या ह्या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत . त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती पण त्या भेटीतून त्यांना उमेदवारी मिळणेबाबत काही निश्चित झाले नाही. त्यामुळे भावना गवळी आता अपक्ष उमेदवारीचा (Loksabha election 2024) अर्ज भरण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही असे राजकीय गोटातून माहिती मिळत आहे.

भावना गवळी यांनी जर अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यास  राजश्री पाटील  यांच्यासमोर तगडे आव्हान उभा राहू शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.