Loksabha election 2024 : वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज – वंचित बहुजन आघाडीने आज (दिनांक 2 एप्रिल) रोजी त्यांची तिसरी यादी (Loksabha election 2024 )जाहीर केली असून वसंत मोरेंना पुण्यातून तर बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे.

याबाबतची  सविस्तर बातमीअशी की, आज (दि. 2 एप्रिल) ला  वंचित बहुजन आघाडीने त्यांची तिसरी यादी लोकसभेच्या निवडणुकीसाठी जाहीर केली असून त्यात ५ जणांना संधी देण्यात आली आहे.  VBA (वंचित बहुजन आघाडी) च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा रेखा ठाकूर (Loksabha election 2024 ) यांनी आज मराठवाड्यातून 3 आणि पश्चिम महाराष्ट्रातून 2 उमेदवारांची नावे लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केली.

वंचितचे जाहीर झालेले उमेदवार  असे आहेत.

  • नांदेड – अविनाश बोसिरकर
  • परभणी-  बाबासाहेब उगळे
  • छत्रपती संभाजीनगर – अफसर खान
  •  पुणे –  वसंत मोरे
  • शिरूर – मंगलदास बागूल

Loksabha election 2024 : पोलिसांचा शंभर टक्के मतदानाचा निर्धार

विशेष म्हणजे, वंचित बहुजन आघाडीने बारामतीतून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा दर्शविला आहे.  वसंत मोरे यांना दिलेली उमेदवारी चर्चेचा विषय झाला आहे.  पुण्यामधून आता मुरलीधर मोहोळ (भाजप), वसंत मोरे(vba) आणि रवींद्र दंगेकर (कॉंग्रेस)  यांच्यात  येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी  काही दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. वसंत मोरे हे गेल्या महिन्यात  मनसे पक्षातील अंतर्गत मतभेदामुळे बाहेर पडून विविध राजकीय नेत्यांशी भेटी घेत होते.  मराठा समाज हा सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर   पुणे आणि आसपासच्या परिसरातून  मराठा समाजाची मते आकर्षित करण्यासाठी वसंत मोरे यांना उमेदवारी दिल्याचे राजकीय गोटातून समजते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.