Lok Sabha elections 2024 : आज होणार लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्प्यातील मतदान

एमपीसी न्यूज – 21 राज्यांतील 102 मतदारसंघांमध्ये आज ( दि. 19 ) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या ( Lok Sabha elections 2024) टप्प्प्यातील मतदान आज होणार आहे. महाराष्ट्र राज्यात विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.   यात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली- चिमूर व भंडारा- गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे.

  या 5 मतदारसंघात 97 उमेदवार रिंगणात असून 95,54,667 मतदार मतहक्क बजावणार आहेत. गडचिरोलीतील दुर्गम व नक्षलप्रवण भागात सात हेलिकॉप्टरने कर्मचारी व ईव्हीएम पाठवले आहेत. मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल.

Talegaon Dabhade : सरसेनापती दाभाडे घराण्याचे वंशज यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव साजरा

गडचिरोलीतील आमगांव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी व भंडारातील अर्जुनी मोरगांव विधानसभा मतदारसंघात 3 पर्यंत मतदानाची वेळ असेल. नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये भाजप व काँग्रेसचा थेट सामना तर रामटेकमध्ये शिंदेसेना व काँग्रेसची लढत ( Lok Sabha elections 2024)  होईल .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.