Maval: लोकसभा लढविण्यासाठी काँग्रेसचे अभिजीत आपटे यांचा पक्षाकडे अर्ज 

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीचे घोडेमैदान जवळ आले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मावळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यासाठी अभिजीत आपटे यांनी पक्षाकडे इच्छूक अर्ज दाखल केला आहे. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसच्या बैठकांचे सत्र सुरु आहे. प्रत्येक मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्यांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छूक उमेदवारांनी आपल्या वैयक्तीक माहितीसह काँग्रेस भवन येथे आपली नोंदणी करावी असे आवाहन केले होते.  शिरूर, बारामती, मावळ लोकसभा मतदार संघातील इच्छूकांनी पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप  यांच्याकडे अर्ज जमा केले आहेत. त्यामध्ये मावळातून काँग्रेसचे कार्यकर्ते अभिजीत आपटे यांनी इच्छूक अर्ज पक्षाकडे सादर केला आहे.

यावेळी मावळ तालुकाध्यक्षा बाळासाहेब ढोरे, कार्याध्यक्ष खंडु केदारी, चंद्रकांत सातकर,  लोणावळा शहराध्यक्ष विलास बढेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. इच्छूक उमेदवार अभिजीत आपटे यांनी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संघटनेबाबत जिल्हाध्यक्ष जगताप यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मतदार संघातील पक्ष बांधणीची माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.