Loksabha Election : पंतप्रधान मोदी यांची ‘नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी’ म्हणत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर प्रहार

एमपीसी न्यूज : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज (दि.15 मे) रोजी नाशिक येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला नकली राष्ट्रवादी असे म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हे दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या सभेत हा दावा केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून ते महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेत आहेत. आज त्यांनी  दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिक येथे सभा(Loksabha Election) घेतली.

या सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की,“काँग्रेसची अवस्था अशी आहे की त्यांना आता विरोधी पक्षातही बसता येणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातले एक बड्या नेत्याने दावा केला आहे की लोकसभा निवडणूक संपल्यानंतर प्रादेशिक पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन होतील.कारण त्यांना वाटतं की सगळी दुकानं सुरु आहेत, ती एकत्र आली तर काँग्रेस विरोधी पक्षात बसू शकतो अशी जहरी टीका पंतप्रधान मोदी यांनी  माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे विधान केले होते.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना आणि शरद पवारांची नकली राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार हे आता नक्की आहे. नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल तेव्हा मला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची सर्वात जास्त आठवण येईल. कारण बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की, ज्यादिवशी शिवसेनेची काँग्रेस होताना दिसेल तेव्हा मी माझं दुकान बंद करेन. आता नकली शिवसेनेचं अस्तित्त्व नक्कीच संपणार आहे. नकली शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेंची स्वप्नं उद्धव ठाकरे यांनी धुळीला मिळवली.बाळासाहेबांना नेहमी वाटत होते की,अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जावे, जम्मू-काश्मीर येथील कलम ३७० मागे घेतलं जावं. आमच्या सरकारने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केले. मात्र सध्याच्या नकली शिवसेनेला या सगळ्याचा खूप राग येत आहे.

Pimpri : ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांच्या ‘त्रिकाल’ काव्यसंग्रहाचे 17 मे रोजी प्रकाशन

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.