LokSabha Elections 2024 :  जिल्हाधिकारी डाॅ.सुहास दिवसे यांनी केली निगडीतील स्ट्राॅग रूमची पाहणी

एमपीसी न्यूज – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डाॅ. सुहास दिवसे (LokSabha Elections 2024 )यांनी आज मावळ लोकसभा मतदारसंघांतर्गत पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी भेट दिल्या.

 

त्यामध्ये ऑटो क्लस्टर, चिंचवड येथील मतदान साहित्य वाटप व स्विकृती केंद्र आणि निगडी प्राधिकरण येथील डॉ.हेडगेवार भवनातील स्ट्राॅग रूमची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना अत्यावश्यक सोयी सुविधा देण्याबाबत सूचना दिल्या.

या भेटी दरम्यान त्यांचेसमवेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव, (LokSabha Elections 2024 )मतदान नोंदणी अधिकारी विनोद जळक, तहसीलदार जयराज देशमुख, नोडल अधिकारी विजय भोजने, मुकेश कोळप,प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते. 206 पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आज मतदान यंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले होते, त्याचीही पाहणी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केली व प्रशिक्षकांसमवेत संवाद देखील साधला.

Pune : वीज दरवाढ दरवाढ मागे न घेतल्यास धरणे आंदोलन करण्याचा सुप्रिया सुळेंचा इशारा

पिंपरी विधानसभा मतदारसंघांमधील विविध भागातील 85 इमारतींमध्ये एकूण 399 मतदान केंद्र असून  सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर आहेत. या मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या 3 लाख 64 हजार 806 इतकी आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.