LokSabha Elections 2024 : भरारी पथकाकडून 1 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा  निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाने मावळ तालुक्यातील सिंहगड, कासुर्डे, शिरगाव व अंबी या ठिकाणी अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या 3 ठिकाणांवर दारूबंदी गुन्ह्याअंतर्गत छापे मारून 3 गुन्ह्यांची नोंद करून 1 लाख 44 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईत 105 लिटर तयार गावठी हातभट्टी दारु, 3 हजार 600 लिटर रसायन व गावठी हातभट्टी दारु  निर्मितीचे  इतर साहित्य  असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही अवैध दारु व्यवसायाविरुद्ध अशाच प्रकारच्या मोहिमा आखून सातत्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नमूद केले आहे.

Chikhali : गॅस चोरी प्रकरणी तरुणास अटक

या कारवाईत दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्हि.एम. माने, जवान पी. टी. कदम, एस.एस. पोंधे, ए. आर. थोरात, एस.सी. भाट, आर. टी. तारळकर व महिला जवान यु.आर. वारे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा तपास राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक व्हि. एम. माने व दुय्यम निरीक्षक ए.बी. पाटील करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.