Lonar Water Turns Pink : लोणार सरोवराच्या ‘गुलाबी’ पाण्याचे वैज्ञानिक संशोधन होणार

Lonar Water Turns Pink: Scientific research will be done on the 'pink' water of Lonar Lake लोणार सरोवरातील पाणी पहिल्यांदाच गुलाबी रंगाचे झाले नसून यापूर्वी देखील झाले होते असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

एमपीसी न्यूज- बुलडाणा जिल्ह्यातील उल्कापातामुळे तयार झालेले खाऱ्या पाण्याचे एकमेव लोणार सरोवरातील पाणी काही दिवसांपूर्वी अचानक गुलाबी रंगाचे झाले होते. या पाण्याचे आता नागपूरस्थित राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी आणि संशोधन संस्थेच्या वतीने परिक्षण केले जाणार आहे.

लोणार सरोवरातील पाणी अचानक गुलाबी रंगाचे कसे झाले या वर हे संशोधन आधारित असणार आहे.

जगभरातील शास्त्रज्ञ आणि पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असलेले लोणार सरोवर जवळपास पन्नास वर्षापूर्वी झालेल्या उल्कापातामुळे तयार झालेले बेसॉल्ट खडकातील एकमेव सरोवर आहे. या सरोवराचा परीघ साधारण 1.2 किलोमीटर एवढा आहे.

काही दिवसांपूर्वी लोणार सरोवरातील पाण्याचा रंग अचानक गुलाबी झाल्यामुळे सर्व जगातील शास्त्रज्ञ व पर्यावरण प्रेमींचे याकडे लक्ष वेधले गेले.

दरम्यान, लोणार सरोवरातील पाणी पहिल्यांदाच गुलाबी रंगाचे झाले नसून यापूर्वी देखील झाले होते असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. तर काही शास्त्रज्ञांनी पाण्यातील क्षार व एकपेशीय वनस्पतींच्या मुळे पाणी गुलाबी झाली असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, नागपूर मधील संशोधन केंद्रातील काही अधिकारी आज (दि.15) सरोवरातील पाण्याचे नमुने घेऊन जाणार आहेत.

पाण्याचा रंग अचानक गुलाबी का झाला यावर तिथे सविस्तर संशोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोणार सरोवरचे जतन व संवर्धनासाठी 1.8 चौरस किमी परिसरातील लोणार विवर (क्रेटर) हे वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यात आले आहे. 1823 मध्ये CJE अलेक्झांडर नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने लोणार सरोवराला एक अनन्य साधारण भौगोलिक स्थळ म्हणून घोषित केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.