Lonavala: कर्करोग निदान शिबिरात 160 महिलांचा सहभाग

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मैत्रिणी ग्रुप, मावळ वार्ता फाऊंडेशन व श्रध्दा हाॅस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने महिलांकरिता आयोजित केलेल्या स्तन कर्करोग निदान शिबिरात 160 महिलांनी सहभाग नोंदवला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांकरिता स्तनांचा कर्करोग व गर्भाशय कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कर्करोग तज्ज्ञ डॉ. राकेश नेवे, श्रध्दा हॉस्पिटलचे डॉ. शैलेश शहा व श्रध्दा हॉस्पिटलच्या संस्थापक डॉ. अंजना शहा यांनी शिबिरार्थी महिलांची तपासणी करत त्यांना सदर रोगांविषयी माहिती व घ्यावयाची काळजी याची माहिती दिली.

संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका शुभांगी किरण गायकवाड, मावळ भाजपाच्या महिलाध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे व लायन्स क्लबच्या अध्यक्षा वत्सला नंदकुमार वाळंज यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन पारख, संजय जी आडसुळे, मावळ वार्ता फाउंडेशन परिवार मैत्रीण ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा मनीषा बंबोरी, सदस्या अमृता लुनावत, हर्षा घोलप, कविता वाळंज, अर्चना माळी, हेमिनी टेलर, निर्मला गायकवाड व सदस्या उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.