Lonavala : चोवीस तासात 266 मिमी पाऊस; पावसाचा जोर कायम

एमपीसी न्यूज- पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या लोणावळा शहरात गेल्या 24 तासात तब्बल 266 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आज, शनिवारी देखील कायम असल्याने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पात्राला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने ग्रामीण भागात नदीला सर्वत्र पूर आला आहे.

वाकसई चाळ, कार्ला, मळवली परिसरातील अनेक सोसायटय़ांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. सांगिसे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने आठ गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास टाटा कंपनीच्या लोणावळा धरणातून इंद्रायणी नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याने लोणावळ्यातील नदीकाठच्या लोकांनी सतर्क रहावे असा इशारा टाटा कंपनीकडून देण्यात आला आहे. मागील आठ दिवसांपासून लोणावळा शहरात पावसाची संततधार सुरू आहे. आठ दिवसात लोणावळ्यात 1565 मिमी पाऊस झाला आहे. संततधार व मुसळधार कोसळणार्‍या पावसाने मावळ तालुक्यातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.