Lonavala : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ओझर्डे फुड माॅलसमोर कार अपघात; सहाजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तळेगावजवळ किमी 78 ओझर्डे फुड माॅलसमोर आज शनिवारी (दि. १४) सकाळी 6.40 च्या दरम्यान भरधाव कार रस्ता दुभाजकाच्या लोखंडी रेलिंगला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात झाला. यात सहाजण गंभीर जखमी झाले असून यात चार मुले आणि दोन मुलीचा समावेश आहे. यातील जखमींवर पवना रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थीनी असे सहाजण आज सकाळी पुण्याहून लोणावळ्याला कार (एचआर 26 सीएफ 9046) मधून फिरायला निघाले होते. ओझर्डे फुड माॅलजवळ त्यांनी कर थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र, कारचा वेग जास्त असल्याने कर रस्ता दुभाजकाच्या लोखंडी रेलिंगवर धडकल्याने हा अपघात झाला.

यामध्ये चालक हर्ष वर्धनता (वय 20, रा. रांची झारखंड), पार्थ गोगिया (वय 20, रा. नोयडा), नितिन सिंग चौधरी (वय 19, रा. नोयडा), अनिशा जैन (वय 19, रा. जयपुर), ब्रिजल पालेजा (वय 19 रा. जम्मू), आदित्य सिंग (वय 19, रा. जम्मू), हे जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.