Lonavala: मास्क न वापरणार्‍या 25 जणांकडून 12500 रुपयांचा दंड वसूल

Lonavala: A fine of Rs 12,500 was levied on 25 people who did not wear masks लोणावळा शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना, वाहन चालविताना चेहर्‍यावर मास्क न लावणार्‍या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई सुरु केली.

एमपीसी न्यूज- मास्क न वापरता बाजारात फिरणार्‍या 25 जणांवर आज रविवारी लोणावळा शहर पोलीस व लोणावळा नगरपरिषद यांनी समांतर कारवाई करत प्रत्येकी 500 रुपयेप्रमाणे 12 हजार 500 रुपये दंड वसुली करण्यात आली.

लोणावळा नगरपरिषद हद्दीत व्यावसायिक अस्थापनांनी व नागरिकांनी कोरोना विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी चेहर्‍यावर मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे.

लोणावळा शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना, वाहन चालविताना चेहर्‍यावर मास्क न लावणार्‍या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई सुरु केली. तसेच सार्वजनिक रस्त्यावर पान, तंबाखू, गुटका खाऊन थुंकल्यास पाचशे ते हजार रुपये दंड आकरणे सुरु केले आहे.

लोणावळा नगरपरिषदेने नुकतीच प्रसिद्धीपत्रकाद्वारे दंडाची माहिती प्रसिद्ध केली होती. यानंतरही चेहर्‍यावर मास्क न लावणार्‍या व्यावसायिकांवर तसेच मास्क न लावता शहरात पायी व गाडीवरून फिरणार्‍यांवर ही कारवाई करत दंड वसूल करण्यात आला.

लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, लोणावळा नगरपरिषदेचे बाजार निरीक्षक सोमवंशी, पोलीस कर्मचारी जयराज पाटणकर, लक्ष्मण उंडे यांच्या पथकाने आजची कारवाई केली.

नागरिकांनी चेहर्‍यावर मास्क परिधान केल्याशिवाय रस्त्यावर फिरु नये, दुकानदारांनी देखील मास्क न लावणार्‍या व्यक्तीला माल देऊ नये, तसेच स्वत: देखील मास्क परिधान करावे.

सायंकाळी पाच वाजता नियमांप्रमाणे दुकाने बंद करावी, दुकानांमध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारी बाळगावी, नागरिकांनी देखिल फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like