Lonavala : मेपल लाॅनमधून अडीच लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – लोणावळ्यात मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मेपल लाॅन येथून तब्बल 2 लाख 60 हजार रुपयांची रोकड असलेली लेदर बॅग अज्ञात चोरट्याने हालचलाखीने लंपास केली आहे. शुक्रवारी सायंकाळी 6.10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी अरविंद देवीचंद जैन (रा. ठाणे, मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात बॅग चोरीची तक्रार दिली आहे.

याबाबत लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन हे शुक्रवारी एका लग्न सोहळ्याकरिता मेपल लाॅन येथे आले होते. त्यांनी पैसे असलेली बॅग शेजारच्या खुर्चीवर ठेवली होती. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ती हातचलाखीने लंपास केली आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रशांत सूर्यवंशी तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.