Lonavala :महामानवाला अभिवादन करण्याकरिता लोटला जनसमुदाय

एमपीसी न्यूज- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता लोणावळा शहरात मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला होता. भारतीय बौध्द महासभेच्या वतीने बाबासाहेबांच्या 128 व्या जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हेच या महासभेचे संस्थापक असून मागील 74 वर्षापासून लोणावळा शहरात जयंती महोत्सव सोहळा होत आहे. शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याकरिता शहरातील नागरिकांसह परिसरातील गावोगावचे नागरिक आले होते. ढोल ताशे, लेझिम या पारंपारिक वाद्याच्या तालावर विविध गावच्या भीमसैनिकांनी प्रतिमांची मिरवणूक काढत महामानवाला विन्रम अभिवादन केले.

  • काही युवा कार्यकर्त्यांनी भीमज्योती आणल्या होत्या. रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले गटाचे) पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अशोक सरवते, मावळ तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, लोणावळा शहर‍ाध्यक्ष कमलशील म्हस्के, नगरसेवक दिलीप दामोदरे आदी‍ंनी येणार्‍या नागरिकांचे स्वागत केले. शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी तसेच विविध संघटन‍ांसह लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील व कर्मचारी य‍ांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.

जयंती महोत्सवानिमित्त शहरात चार दिवसात लोणावळा आयडाॅल हा स्थानिक कलाकार‍ांचा हिंदी, मराठी व भीमगीतांच्या स्पर्धा पार पडल्या. आज सकाळी पंचशील ध्वजारोहण व धम्म विधी पार पडला. सायंकाळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक, सभा, गायन पार्टीचा जंगी सामना होणार आहे. सोमवारी पहाटे लोणावळा शहरात स्वच्छता अभियान, सायंकाळी रमाई सांस्कृतिक प्रेरणा महोत्सव, नृत्य स्पर्धा, आँर्केस्ट्रा अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.