Lonavala : लोणावळ्याजवळील कुणेनामा ग्रामपंचायतीच्या सदस्याला मारहाण

एमपीसी न्यूज : कुणेनामा ग्रामपंचायतीने बनविलेला (Lonavala) सिमेंटचा रस्ता का खोदता? अशी विचारणा केली म्हणून चार जणांनी मिळून ग्रामपंचायत सदस्याला मारहाण केल्याचा प्रकार लोणावळ्या जवळीला कुणेनामा गावात 31 मार्च रोजी सायंकाळी घडला आहे.

याप्रकरणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय नाना ढाकोळ यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलिसांनी रात्री उशिरा चंद्रकांत दत्तू ढाकोळ, सागर मधुकर उंबरे, राजेंद्र मारुती वरखडे व बैजु मँथ्यु (पूर्ण नाव माहीत नाही; सर्वजण रा. कुणेगाव खंडाळा, ता. मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

31 मार्च रोजी सायंकाळी 6.40 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वरील चौघेजण ग्रामपंचायतचा सिमेंटचा रस्ता खोदत होते. याबाबत विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच संजय ढाकोळ (Lonavala) यांनी विचारणा केली असताना चंद्रकांत ढाकोळ याने लोखंडी राॅडने ढाकोळ यांच्या उजव्या पायावर मारहाण केली.

Pavana Sahakari Bank : अण्णासाहेब मगर सहकार पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला

त्यामध्ये त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तर अन्य तिघांना लाथा बुक्क्यांनी  मारहाण केली. तसेच, शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हंटले आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार घोटकर अधिकचा तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.