_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Lonavala: शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनला खंडाळा घाटात अपघात

Lonavala: A police van belonging to Sharad Pawar's convoy met with an accident in Khandala Ghat शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना ताफ्यात मागे असलेल्या पोलीस व्हॅनच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन रस्त्यात आडवी झाली.

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा ताफ्यातील पोलिसांच्या व्हॅनला आज (दि.29) सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. यात काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यातील पोलीस पायलट व्हॅन मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पुलाच्या खाली आज सकाळी उलटली. यामध्ये एकाला किरकोळ मार लागला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

_MPC_DIR_MPU_II

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आजचा दिवस हा अपघाती दिवस बनला आहे. सकाळी खोपोली शहर‍च्या हद्दीत ढेकू गावाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात झाला होता. या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले होते.

याठिकाणी झालेली अपघातांची कोंडी कमी होते न होते तोच खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अमृत‍ांजन पुलाच्या खाली पोलीस व्हॅन उलटली. शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना ताफ्यात मागे असलेली पोलीस व्हॅनच्या (एमएच 12 एनयू 5881) चालकाचे गाडीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्यात आडवी झाली.

महामार्गावरील देवदूत पथक व खंडाळा महामार्ग पोलिसांनी तात्काळ चालक व किरकोळ मार लागलेल्या पोलीस कर्मचार्‍यावर प्राथमिक उपचार करत अपघातग्रस्त वाहन बाजूला केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.