Lonavala : खंडाळ्यातील एका महिलेला कोरोनाची लागण; आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह 

A woman in Khandala infected with corona; The reports of eight people were negative

एमपीसीन्यूज : खंडाळ्यात कोरोनाची लागण झालेल्यस ज्येष्ठ नागरिकाच्या घरातील नऊ सदस्यांचे स्वॅब कोरोना चाचणी करिता पाठविण्यात आले होते. यापैकी आठ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका महिला सदस्याचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

मंगळवारी खंडाळ्यात  74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली होती. यानंतर लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून त्याच्या घरातील हाय रिस्कमधील नऊ जणांचे स्वॅब कोरोना तपासणी करिता पाठविले होते.

तर लो रिस्कमधील इतर 70 जणांना क्वारंटाईन केले होते. कोरोना तपासणीकरिता पाठविलेल्या नऊ जणांपैकी एका महिला सदस्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

आता खंडाळ्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन झाली असून त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत. अहवाल निगेटिव्ह आलेल्या इतर आठ सदस्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like