Lonavala : सोशल मीडियावर जातीयवादी पोस्ट टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : ‘फेसबुक’वर समाजात तेढ निर्माण करणारी जातीयवादी पोस्ट  टाकल्याप्रकरणी कुरवंडे ( ता. मावळ) येथील एका युवकावर भादंवि कलम 153(अ), 505 अन्वेय लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

मित सुरेश भावेकर (रा. कुरवंडे लोणावळा ता.मावळ जि पुणे) , असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. आहे. याबाबत पोलीस नाईक अमोल कसबेकर यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 एप्रिल रोजी भावेकर याने फेसबुकवरून दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट प्रसारित केली होती. त्यामुळे त्याच्याविरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like