Lonavala : द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण ठार; एक गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर सिंहगड काॅलेज जवळ हा अपघात झाला.

नारायण गुंड (रा. कुसगाव) व महंमद (पूर्ण न‍ाव पत्ता समजु शकला नाही) हे दोघे या अपघाता मृत झाले असून हरिभाऊ शिवराम काळे (रा. कुसगाववाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत.

खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक खाजगी प्रवासी बस मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणार्‍या मार्गावर सर्व्हिस लेनवर उभी होती. या गाडीमधून गुंड व काळे हे चिक्कीसाठीचे सामान डिक्कीतून काढत होते व क्लिनर महंमह हा गाडीच्या मागे उभा राहून मागून येणार्‍या गाड्यांना दिशा दाखवत होता. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने या तिघांना धडक दिली. यामध्ये महंमद याचा जागीच तर गुंड याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. गंभीर जखमी झालेला काळे याची स्थिती देखील नाजुक आहे. खंडाळा महामार्गचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंडले व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात रवाना केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.