Lonavala : द्रुतगती मार्गावर बोरघाटात टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बोर घाटातील मारुती मंदिरासमोर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक टँकर तीव्र उतारावर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यामध्येच उलटला. सकाळीच झालेल्या अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन रस्ता ठप्प झाला. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईकडे जाणारी द्रुतगती महामार्गावरील वाहतूक राष्ट्रीय महामार्गावर वलवण गावाजवळ वळविण्यात आल्याने लोणावळा शहरात देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. दहा वाजण्याच्या सुमारास सदरचा टँकर बाजूला काढण्यात आला मात्र सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक सुरळीत होण्यास बराच काळ लागला. वाहतूक सुरळीत झाल्यानंतरही दुतगती महामार्ग वाहने ही राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आल्याने लोणावळा खंडाळा परिसरात तसेच वळवण एक्झिट भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.