Lonavala accident : लोणावळ्यात मोटार सायकलच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू 

एमपीसी न्यूज : जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील रिदम हॉटेल समोर एका अज्ञात वाहनाने मोटार सायकलला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. (Lonavala accident) अपघातातील दोन्ही मयत हे वीटभट्टी कामगार असून, दोघे सख्खे साडू होते. दिपक परशुराम पवार (वय-40) व लक्ष्मण तातुराम वाघमारे (वय-30, दोघेही रा. सावरोली, खोपोली, रायगड) असे अपघातात मृत्यू झालेल्या वीटभट्टी कामगारांची नावे आहेत.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक आणि लक्ष्मण हे दोघे सख्खे साडू लोणावळ्या जवळील देवघर येथील एका वीटभट्टीवर वीटभट्टी कामगार म्हणून काम करत होते. ते रविवारी काही कामानिमित्त त्यांच्या गावाला मोटार सायकलने (MH 06 AM 6395) गेले होते.

Lonavala : श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या 4 जागांचा निकाल जाहिर; देवकर, पडवळ, देशमुख विजयी

रविवारी रात्री ते पुन्हा गावाहून देवघरला परत येताना (Lonavala accident) जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील रिदम हॉटेल समोर त्यांच्या मोटारसायकलला एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.