_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Lonavala : मास्क परिधान न करणार्‍या 71 जणांवर कारवाई; 35 हजारांचा दंड वसूल

Action against 71 people for not wearing masks; 35 thousand fine recovered

एमपीसीन्यूज : लोणावळा शहरात चेहर्‍यावर मास्क परिधान न करता फिरणार्‍या 71 जणांवर लोणावळा शहर पोलीस स्टेशन व लोणावळा नगरपरिषद यांच्याकडून कारवाई करुन 35 हजार पाचशे रुपये दंड वसुल करण्यात आला. मागील तीन दिवसात ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली.

लोणावळा नगरपरिषद हद्दीत व्यावसायिक अस्थापनांनी व नागरिकांनी कोरोना विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी चेहर्‍यावर मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

लोणावळा शहरात पोलीस प्रशासन व लोणावळा नगरपरिषद प्रशासन यांनी मागील आठवड्यापासून चेहर्‍यावर मास्क न लावता फिरणार्‍यावर दंडात्मक कारवाई मोहिम हाती घेतली होती.

या मोहिमेंतर्गत 28 ते 30 जून या तीन दिवसात पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव व मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सामिल प्रकाश, जयराज पाटणकर, अमोल कसबेकर, संदीप शिंदे, वैभव सुरवसे, बाजार निरीक्षक प्रकाश सुर्यवंशी यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.