Lonavala : हातभट्टी चालविणाऱ्या आठ जणांवर कारवाई; 40 हजारांचे कच्चे रसायन जागीच नष्ट

एमपीसी न्यूज : लाॅकडाऊन काळात दारुबंदीचे उल्लंघन करीत चोरून हातभट्टी चालविणार्‍या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 8 जणांवर दारूबंदी कायद्यार्तंगत गुन्हे दाखल केले. तसेच त्यांच्या जवळील 40 हजार रुपयांचे कच्चे रसायन जागीच नष्ट करून 3,092 रुपयांचा माल जप्त केला.

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदिप घोरपडे यांनी ही माहिती दिली. सध्या लोणावळा शहर आणि परिसरात लाॅकडाऊन संचारबंदी लागू आहे. असे असतानाही लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरून हातभट्टी सुरु होती. याबाबत माहिती मिळाल्यांनतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा करून दारूभट्टी उध्वस्त केली. तसेच 40 हजार रुपयांचे कच्चे रसायन जागीच नष्ट करून 3,092 रुपयांचा माल जप्त केला. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यन, लॉकडाउन व संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आजअखेर 85 जणांवर भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी 62 मोटार सायकली, 5 कार, 1 सुमो मोटार, 1 स्कॉर्पिओ, 1 टेम्पो आदी वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. वडगाव न्यायालयांकडून यापैकी 35 जणांना मिळून 18 हजार रुपये दंड व 3 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.