Lonavala : निष्काळजीपणे वाहन चालविणार्‍या वाहनचालकावर कारवाई

एमपीसी न्यूज- वाहतूक नियमाचा भंग करत अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणार्‍या वाहन चालकावर लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली.

तरबेज अन्सारी (वय 44, रा. कुर्ला मुंबई) असे या वाहन चालकाचे नाव आहे. शनिवारी दुपारी पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना अन्सारी यांनी दुचाकीवरुन जाणार्‍या दोन मुलींना कट मारला. यावेळी ट्रकखाली पडता पडता वाचलेल्या त्या मुली अन्सारी यांच्या कारचा पाठलाग करत असताना सदर कार चालकाने ट्रॅफिक वाॅर्डनचा इशारा न मानत नो यु टर्नच्या जागी टर्न घेत वाॅर्डनच्या पायावर गाडीचा टायर चढवत अरेरावी केली.

सदरच्या चालकाला संबंधित मुली व ट्रॅफिक वाॅर्डन यांनी पाठलाग करुन पकडले असता त्याने त्यांना शिविगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी अन्सारी याला लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर मुंबई मोटार वाहन कायदा कलम 279, 184 व 506 प्रमाणे करवाई करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा शहरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.