BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : शाश्वत पर्यटन वृद्धीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘गुडविल अम्बेसिडर’ म्हणून काम करावे – जयकुमार र‍ावल

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट राज्य असून देश आणि परदेशातील पर्यटकांना सर्वस्पर्शी पर्यटनाच्या व्यापक संधी राज्यात उपलब्ध आहेत. निसर्गाने राज्याला भरभरून नैसर्गिक संपदा दिली आहे. राज्यातील गड-किल्ले, जागतिक वारसास्थळे, निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, धार्मिक पर्यटन,समुद्र किनारा, समुद्रातील बीचेस, प्राचीन मंदिरे, बॉलिवूड पर्यटन आशा विविध प्रकारच्या पर्यटन क्षेत्रात पर्यटनकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर आहे. जागतिक स्तरावरही विभागाच्या मार्फत पर्यटन सहकार्याबाबत प्रयत्न होत आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटन स्थळे उपलब्ध आहेत. अशा पर्यटन स्थळांचा पर्यटनदृष्ट्या सक्षम विकास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर ‘पर्यटन गुडविल अम्बेसीटर’ म्हणून जोमाने काम करावे, असे आवाहन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्यांना केले.

कार्ला (ता.मावळ, जि. पुणे) येथील पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवसावर राज्यातील अप्पर जिल्हाधिकारी, व विभागीय आयुक्त यांची राज्यातील पर्यटन विकासावरील पहिली कार्यशाळा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

  • यावेळी महाराष्ट्र पर्यटन संचनालायचे, संचालक दिलीप गावडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, संजीव कुमार, माने, प्रादेशिक संचालक दीपक हरणे, महादेव हिरवे यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी व अप्पर आयुक्त उपस्थित होते.

या कार्यशाळेत बोलतांना पर्यटन मंत्री रावल पुढे म्हणाले की, पर्यटन हे व्यापक रोजगार निर्मितीचे क्षेत्र आहे. ग्रामीण महाराष्टात मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढीला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे.या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण होणार आहे.

  • “विविध फेस्टिव्हल” आयोजन करून पर्यटनाला चालना व पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती होत आहे. अनेक तरुणांना या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटन विकासासाठी पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे, अशी सूचना करण्यात आल्याचे सांगितले. सोबतच कार्ला लेणी येथील गडाच्या पायर्‍या बनविण्याकरिता तीन कोटी रुपयांचा निधी देण्याचे मान्य केले.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3