Lonavala : परराज्यातील मजूर कुटुंबातील नागरिकांना पोलिसांकडून चहा, पोहे वाटप

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे गावाकडे निघालेल्या मजुरांना आहे तेथेच थांबवून त्यांची जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत. या सूचनेनुसार बाहेरील जिल्ह्यातील काही मजुर वाकसई गावाजवळ थांबले आहेत.

या मजुरांना व त्यांच्या कुटुंबीयांना लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रनवरे, पोलीस हवालदार विशाल जांभळे, योगेंद्र जगताप, दुर्गा जाधव, अनिकेत शेळके यांनी त्यांच्या तांड्यावर जाऊन चहा व पोहे वाटप केले.

जमावबंदी व संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यासाठी सर्व टोलनाके व जिल्ह्यांच्या हद्दी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावाकडे निघालेले मजुर यांना आहे तेथेच थांवबून शासकिय मदत देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, परराज्यातील मजुर व त्यांच्या कुटुंबीयांची गैरसोय टाळण्याकरिता ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेत सकाळचा चहा, नाष्टा उपलब्ध करुन दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.