Lonavala : रोटरी क्लब लोणावळा आणि महिंद्रा क्लब यांच्या वतीने केवरे चाफेसर गावाला रुग्णवाहिका भेट

एमपीसी न्यूज – पवन मावळातील केवरे चाफेसर या दुर्गम भागातील नागरिकांना तातडीच्या वैद्यकिय सेवेकरिता रोटरी क्लब लोणावळा व महिंद्रा क्लब यांच्या वतीने या गावाला नुकतीच रुग्णवाहिका भेट देण्यात आली.

याच कार्यक्रमाचा भाग म्हणून तुंग किल्ल्याच्या पायथ्यालगत असलेल्या तुंगी गावात स्वच्छतेसाठी 06 मोठ्या डस्टबीन तर, घरगुती वापरासाठी 160 लहान डस्टबीन देण्यात आल्या, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीला पाचशे आंब्याच्या झाडांचे वाटप करण्यात आले. महिंद्रा क्लबचे बीपलॅब बॅनर्जी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी उपसरपंच नवनाथ कुढले, रोटरीचे अध्यक्ष उदय पाटील, अहमद मिराज, स्वाती मिश्रा, रवि कुलकर्णी, दिलीप पवार, गोरख चौधरी, शाम पवार, अशिष मेहता, संदेशकुमार,रूपेश अंबेकर, हिमांशू शर्मा उपस्थित होते.

आरोग्याच्या सोबत स्वच्छतेसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे गावकऱ्यांनी स्वागत केले. रोटरी उदय पाटील यांनी प्रास्ताविक केले तर रवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. स्वाती मिश्रा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.