Lonavala  : राजगृहाची तोडफोडी करणाऱ्यांना त्वरित अटक करा : सूर्यकांत वाघमारे 

Arrest those who vandalized the Rajgruh immediately: Suryakant Waghmare : आरोपींवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान  व  आंबेडकरी अनुयायांचे  प्रेरणास्थान असलेल्या ‘राजगृह’ ची तोडफोड करणार्‍या  समाजकंटकांना त्वरित अटक करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( आठवले गट) पुणे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने केली. 

याबाबत  रिपाइंच्या शिष्टमंडळाने लोणावळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  मनोजकुमार यादव यांना निवेदन दिले.

यावेळी रिपाइंचे लोणावळा शहर अध्यक्ष कमलशील म्हस्के, पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, मावळ तालुका मुख्य सचिव अशोक सरवते, नगरसेवक दिलीप दामोदरे, जयराम कदम, संतोष गायकवाड, बापू यादव, राजू सरावते, मनोज भालेराव  आदी उपस्थित होते.

तसेच आरोपींवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा  सुर्यकांत वाघमारे यांनी दिला आहे.

 

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.