Lonavala : वाईन शाॅप फोडण्याचा प्रयत्न करणार्‍याला अटक

एमपीसी न्यूज  : लोणावळा शहरातील महाराष्ट्र वाईन हे दारुचे दुकान फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या एकाला लोणावळा शहर पोलिसांनी मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास अटक केली.

सागर पिंटू उठवाल (वय 24,  वर्ष रा. सिद्धार्थ नगर, लोणावळा, ता. मावळ, जि.  पुणे)  असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

लोणावळा शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास उठवाल हा महाराष्ट्र वाईनच्या दुकानाचे बाहेरील लोखंडी गेट तोडून दुकानाचे मुख्य दरवाजाचे शटरचे कुलूप दगडाने तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करताना गस्त पथकाला मिळून आला. त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.  पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वैभव सुरवसे तपास करत आहेत.

गावठी हातभट्टी विकणार्‍याला अटक

तुंगार्ली धरणाच्या जवळ पांगळोली ठाकरवस्ती येथे गावठी हातभट्टीची दारु विकणार्‍या संतोष कोंडिबा हिरवे (रा. पांगळोली- ठाकरवस्ती, लोणावळा) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 450 रुपये किंमतीचे पाच लिटर दारु व दुचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे. हिरवे हा डोंगरात चोरुन दारु विकत आल्याची खबर लोणावळा शहर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभागाला मिळाली होती. त्याअनुषंगाने डीबी प्रमुख सामिल प्रकाश व टिम यांनी ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.