Lonavala crime News: अट्टल चोरटा लोणावळा शहर पोलिसांच्या जाळ्यात

त्याच्याकडून खंडाळा येथील बंगल्यातून चोरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

एमपीसीन्यूज : खंडाळा येथील वाघजरीच्या डोंगरात लपून बसलेल्या अट्टल चोरट्याला लोणावळा शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून खंडाळा येथील बंगल्यातून चोरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

बिबिषण उर्फ बाब्या जालिंदर जगताप (वय 42, रा. 220, मंगळवार पेठ, पुणे) असे या अट्टल चोरट्याचे नाव आहे.

खंडाळा येथे एका बंगल्यातील किंमती व जुन्या काळातील ऐवजांची चोरी झाली होती. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना लोणावळा शहर स्थानिक गुन्हे शोध पथकाला गुप्त माहिती समजली की एक अट्टल चोरटा नागफणी सुळक्याच्या मागील बाजुला असलेल्या वाघजरीच्या डोंगरात तळ ठोकून बसला आहे.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक वैभव सुरवसे, पोलीस काॅन्स्टेबल राजेंद्र मदने, पवन कराड, राहुल खैरे, अजीज मेस्त्री, मनोज मोरे व पोलीस मित्र यांनी भरपावसात वाघजरीच्या डोंगरात शोध मोहिम सुरू करत बाब्याला ताब्यात घेत अटक केली.

त्याच्याकडून खंडाळा येथील बंगल्यातून चोरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.