BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : बाळासाहेब ठाकरे यांची जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी साजरी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी आठ वाजता खंडाळा बाजारपेठ ते लोणावळा शिवाजी चौक दरम्यान ही स्पर्धा पार पडली. यासह नगरपालिका प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, छत्रपती शिवाजी महाराज चौक लोणावळा येथे भगवा ध्वजारोहण व खाऊ वाटप, अंधवृद्धाश्रम येथे अन्नदान, छत्रपती शिवाजी महाराज चौक लोणावळा येथे शिवसेना शाखा तुंगार्लीच्या वतीने हिंदू जागर ज्योत व तुंगार्ली येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका व विरोधी पक्षनेत्या शादान चौधरी, शहर प्रमुख सुनील इंगुळकर, मावळ तालुका समन्वयक बाळासाहेब फाटक, शहर संघटक सुभाष डेनकर, दीपाली भिलारे, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, सिंधुताई परदेशी, जयवंत दळवी, मनीष पवार, प्रकाश पाठारे, संजय भोईर, प्रवीण काळे, प्रसिद्धीप्रमुख विजय आखाडे महेश खराडे विभाग प्रमुख भगवान देशमुख आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

.