सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

Lonavala : पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो !

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनांचे आकर्षण बिंदू असलेले भुशी धरण आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. धरण फुल होऊन सांडव्यावरुन पाणी वाहू लागल्याने परिसरातील व्यावसायकांनी एकच जल्लोष केला.

तब्बल तीन आठवडे उशिराने सुरु झालेल्या मान्सूनने अवघ्या चार दिवसातच भुशी धरण ओव्हरफ्लो झाले. तीन दिवसात शहरात 456 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

संततधार कोसळणार्‍या पावसामुळे डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू ल‍ागल्याने डोंगरातून येणार्‍या या पाण्यामुळे अवघ्या तीन दिवसातच धरण पूर्ण भरुन सांडव्यावरुन पाणी वाहू लागले. आज सोमवार असताना देखील धरण परिसरात आलेल्या पर्यटकांना धरणाच्या पायर्‍यांवर बसून भिजण्याचा आनंद घेता आला. धरणाच्या पायर्‍यांवर लावण्यात आलेल्या लाकडी फळ्या काढण्याचे काम सुरु करण्यात आले असून त्यानंतर पायर्‍यांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहण्यास सुरुवात होणार आहे.

spot_img
Latest news
Related news