Lonavala : भुशी धरण ‘ओव्हरफ्लो’; कोरोनामुळे धरणावर निरव शांतता

Bhushi dam 'overflow'; Absolute silence on the dam due to the corona : भुशी धरण 'ओव्हरफ्लो'; कोरोनामुळे धरणावर चिटपाखरुही नाही

एमपीसीन्यूज : पर्यटकांना खुशखबर आहे. लोणावळा येथील पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले भुशी धरण आज, शनिवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले. सध्या कोरोनामुळे पर्यटनाला बंदी असल्याने धरणाच्या पायर्‍यावरुन पाणी वाहू लागले असले तरी धरणावर आज चिटपाखरु देखील नव्हते.

मुंबई – पुण्याच्या मध्यावर असलेले लोणावळा शहर हे पावसाळी पर्यटनाकरिता प्रसिद्ध आहे. राज्यभरातून लाखो पर्यटक दरवर्षी येथे पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात.

यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा परिसरातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आल्याने शनिवार, असला तरी आज, धरणावर निरव शांतता होती.

लोणावळा शहरात कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.