Lonavala : वारीस पठाण यांच्या बेलगाम वक्तव्याचा लोणावळा भाजपाकडून निषेध

एमपीसी न्यूज- माजी आमदार वारीस पठाण यांनी केलेल्या बेलगाम वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा लोणावळा मंडलच्या वतीने निषेध सभा घेत संताप व्यक्त करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपा मंडलचे अध्यक्ष रामविलास खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. माजी आमदार वारीस पठाण हे बेताल वक्तव्य करुन हिंदु मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. देशातील हिंदु हा सहिष्णु असून मुस्लिम समाजाला कधीही अपमानास्पद वागण वागणूक देत नाही. असे असताना पठाण देशाच्या एकात्मतेला बाधा आणण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका याप्रसंगी रामविलास खंडेलवाल व अरविंद कुलकर्णी यांनी केली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी देखील पठाण यांच्या विधानाचा खरपुस समाचार घेतला.

यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अरविंद कुलकर्णी, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक देवीदास कडू, महिलाध्यक्षा योगिता कोकरे, सुधीर राईलकर, गिरीश मुथा, ललित सिसोदिया, नवीन भुरट, कमलेश सेंगर, हेमंत कांबळे, प्रकाश तांबट, सुनील तावरे, दीपक कांबळे, सुनील चोरडिया, अनिल खिल्लारे, गणेश साठे, सचिन पत्की, परिजा भिल्लारे, सुनीता खरपासे, पल्लवी चोरडिया, मांगिलाल ओसवाल, सुभाष सोनी, निश्चय भुरट, सहज पालरेचा, चंद्रकांत फडके यांच्यासह कार्यकर्ते जमले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.