Lonavala : महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपाची घोषणाबाजी

0

एमपीसीन्यूज : लोणावळा शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज, शुक्रवारी भाजी मार्केट चौकात महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत हे आंदोलन करण्यात आले.

राज्यात कोरोनाला रोखण्यात शासनाला अपयश आले आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. कोरोना राज्यात पसरत असताना ठाकरे सरकार घरात बसले असल्याची टिका नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी यावेळी केली.

राज्य शासनाकडून जनतेला वार्‍यावर सोडले आहे. शासनाकडून राज्यातील जनतेला कोरोनापासून वाचविण्याचे कोणतेही धोरण नाही. कसलेही पॅकेज अथवा मदत दिली गेली नाही. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्ह्यात लोकप्रतिनिधी यांची साधी आढावा बैठक घेतली नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

यावेळी लोणावळा शहर भाजपा मंडल अधिकारी रामविलास खंडेलवाल, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मावळ तालुका महिलाध्यक्षा सायली बोत्रे, शहराध्यक्षा योगिता कोकरे, नगरसेवक देविदास कडू, राजाभाऊ खळदकर, ब्रिंदा गणात्रा, मंदा सोनवणे, रचना सिनकर, विजय सिनकर, जितेंद्र बोत्रे, दिलीप गुप्ता, ललित सिसोदिया, सुनिल तावरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like