Lonavala : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शिबिरात 166 जणांचे रक्तदान

Lonavala: Blood donation of 166 people in the camp of Nanasaheb Dharmadhikari Pratishthan

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सर्वत्र रक्तदान शिबिरे होत आहेत. लोणावळ्यात श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवारी भांगरवाडी येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 166 सदस्यांनी रक्तदान केले.
पद्मश्री डाॅ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन अ‍ॅड. माधवराव भोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राधिक भोंडे, पंकजा काचरे, अमोल साळवे, अंजुम शेख व प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
ससून ब्लड बँकेचे संयोजक डाॅ. देसले व पॅथॅलॉजी प्रमुख गणेश लांडे व वैद्यकिय अधिकारी टीम यांनी शिबिरातील रक्त संकलानचे नियोजन केले.
लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मिलिंद खळदकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.