Lonavala : कार्ला येथे शिवभक्तांना अल्पोपहाराचे वाटप

एमपीसी न्यूज – छञपती शिवाजी महाराजांच्या तिथीप्रमाणे साजरी केल्या जाणाऱ्या जयंतीचे औचित्य साधून किल्ले लोहगड व विसापूर येथून शिवज्योत घेऊन जाणा-या शिवभक्तांना अल्पोपहारचे वाटप करण्यात आले. युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे हे गेली सहा वर्षे शिवज्योतींचे स्वागत व शिवभक्तांना अल्पोपहार वाटप हा उपक्रम राबवत आहेत.

 

_MPC_DIR_MPU_II

ऐतिहासिक कार्लानगरीत शिवज्योतींचे स्वागत करण्यात आले.तसेच अल्पोपहार वाटप करण्याचे नियोजन युवासेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, शिवशंकर मंडळाचे अध्यक्ष दिलीप हुलावळे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब हुलावळे, संभाजी हुलावळे, गणेश हुलावळे यांनी केले होते. यश ओसवाल यांनी शिवभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती.

 

हा अल्पोपहार वाटपाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोहिदास शिर्के, कुमार हुलावळे, सिंकदर शेख, सचिन हुलावळे, अक्षय हुलावळे, सुनील हुलावळे, बाळू हुलावळे, अनिल पाटील यांनी परीश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.