Lonavala : महामार्गावर तुटलेल्या दुभाजकाचे दगड अस्ताव्यस्त पडल्याने वाढतोय अपघाताचा धोका

एमपीसी न्यूज – लोणावळा शहरातून जाणार्‍या जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला किरण पेट्रोल पंप ते संचेती लाँन दरम्यान लावण्यात आलेले दगडी दुभाजक पेट्रोल पंप ते मिनू गॅरेज दरम्यान तुटल्याने दगड रस्त्यावर अस्ताव्यस्त पडले आहेत, यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढत आहे.

जुन्या राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूककोंडी कमी करण्याकरिता तसेच लेन कटिंगची समस्या टाळण्याकरिता या मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात दगडी दुभाजक बसविण्यात आले होते. तसेच दुभाजक दिसण्याकरिता जागोजागी लोखंडी ड्रम उभे करण्यात आले होते. रात्रीच्या अंधारात अज्ञात वाहनांच्या धडक बसल्याने हे दुभाजक तुटले आहेत. तसेच ड्रम देखिल खराब झाले आहेत. सध्या हे दगड व ड्रम रस्त्यावरच अस्ताव्यस्त पडले आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

याबाबत रस्ते विकास महामंडळाचा नियंत्रण कक्ष व नविन ठेकेदारांला फोन करुन याबाबत कल्पना दिल्यानंतर कामाला प्राधान्य देण्याऐवजी प्रत्येकजण एकमेकाकडे बोट दाखवत जबाबदारी झटकण्याचे काम करत असल्याचे समजते. याठिकाणी काही अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.