Lonavala : जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा घाटात बस दरीत कोसळली; 5 जणांचा मृत्यू तर, 24 जखमी

एमपीसी न्यूज – मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा बोरघाटा लगतच्या गारमाळ घाटातील वळणावर खासगी प्रवासी बस दरीत कोसळल्याने या बसमधील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात बस रस्त्यावरुन काही फुट दरी गेली आहे.

सर्वज्ञा सचिन थोरात (वय 3, रा. कराड), स्नेहा जनार्दन पाटील (वय 15, रा. घाटकोपर), जनार्दन पाटील (वय 45, रा. घाटकोपर), संजय शिवाजी राक्षे (वय 50, रा. पवई) व प्रमिला रामचंद्र मोहिते (वय 50, रा. बेलवले बु. कराड) अशी अपघातात मृत्यू पाच जणांची नावे आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार (एमएच 04 एफके 1599) ही खाजगी प्रवासी बस कराडहून मुंबईच्या दिशेने ‘एक्सप्रेस वे’ला लागूनच असलेल्या जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील गारमाळ घाटातून खाली उतरत असताचा चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्ता सोडून काहीशी खोल दरीत गेली. यामुळे झालेल्या अपघातात बसमधील एक लहान मुलीसह चार जणाचा मृत्यु झाला तर, 24 प्रवासी जखमी झाले आहेत.

जखमीपैकी 13 जणांना गंभीर स्वरुपाचा मार लागला आहे. सर्व जखमींवर एमजीएम हाँस्पिटल कामोठे, पवना हाँस्पिटल सोमाटणे, लोकमान्य हाँस्पिटल निगडी, खोपोली हाँस्पिटल याठिकाणी उपचार सुरु आहेत. महामार्ग पोलीस यंत्रणा, देवदूत पथक, अपघातग्रस्तांच्या मदतीला या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांनी सर्व मयत वजखमी यांना बाहेर काढत जखमींना तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.