Lonavala : हजरत शाहवली बाबांना चादर चढवून युवक काँग्रेस कडून पार्थ पवारांचा प्रचार सुरु

एमपीसी न्यूज- लोणावळा रायवुड येथील हजरत कासिम शाहवली दर्गा (मदिना मस्जिद) येथे चादर चढवत आज लोणावळा शहर युवक काँग्रेसच्या वतीने पार्थ पवार यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निखिल कविश्वर, काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या आरोही तळेगावकर, आरोग्य समिती सभापती संध्या खंडेलवाल, ज्येष्ठ नेते सुबोध खंडेलवाल, उमेश तळेगावकर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता दळवी, फिरोज बागवान, शिवराज मावकर, फिरोज शेख, नयन अकोलकर, मंगेश बालगुडे, आकाश परदेशी, सुर्यकांत औरंगे यांच्यासह युवक काँग्रेसचे व अल्पसंख्याक आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • पार्थ पवार आगे बडो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत युवक काँग्रेसच्या वतीने पदयात्रा काढत प्रचाराला प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना निखिल कविश्वर म्हणाले युवक काँग्रेसच्या वतीने घर घर चलो अभियान राबवत काँग्रेस पक्षाची विचारसरणी व पक्षाचा जाहीरनामा घरोघरी पोहचविण्याचे अभियान सुरु करण्यात आले आहे. याच धर्तीवर काॅग्रेस पक्षाचा अजेंडा व पार्थ पवार यांची माहिती प्रत्येक नागरिकांपर्यत पोहचविण्याकरिता युवक काँग्रेसच्या वतीने काम सुरु करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.