BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : द्रुतगती मार्गावर ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात 3 जण ठार

दुसऱ्या अपघातामध्ये तीनजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- भरधाव वेगात जाणाऱ्या आर्टिका कारने पुढे असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तीन जण जागीच ठार झाले. तर दुसऱ्या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही अपघात आज दुपारी सव्वादोनच्या पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर घडले.

जखमी झालेल्यापैकी दोन जणांना एमजीएम तर एकाला लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अपघातात ठार झालेल्या तीन जणांचे मृतदेह खालापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.

मुंबईकडून आर्टिका कारने चालक व दोन प्रवासी पुण्याच्या दिशेने निघाले होते. खालापूर हद्दीतील फुडमॉल येथे कारचालक भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रकला मागच्या बाजूने धडक दिली. या अपघातात चालकासह दोन प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर त्याच ठिकाणी दुसऱ्या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3