Lonavala : आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत कार्ला विद्यालय प्रथम; मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण

एमपीसी न्यूज – लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत कार्ला येथील एकविरा विद्या मंदिर शाळेचा प्रथम क्रमांक आला.

पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांच्या संकल्पनेतून आणि लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे तसेच पोलिस निरिक्षक दीपक लुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण हद्दीतील आठ माध्यमिक शाळांची आंतरशालेय कबड्डी स्पर्धा कुसगाव येथील सिंहगड महाविद्यलयात पार पडली.

  • यामध्ये प्रथम क्रमांक कार्ला येतील एकविरा विद्या मंदिर शाळा तर, द्वितीय क्रमांक औंढे येथील नागनाथ माध्यमिक विद्यालय आणि तृतीय क्रमांक पवनानगर येथील पवना विद्या मंदिर शाळेने मिळवला. तर, मळवली येथील शांतीदेवी गोपिचंद गुप्ता विद्यालयाला उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.

या स्पर्धेचे उदघाटन आणि बक्षिस वितरण समारंभ सिंहगड महाविद्यलयाचे प्राचार्य व संकूल संचालक एम. जी. गायकवाड, लोणावळा पोलिस निरिक्षक दीपक लुकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

  • यावेळी उपप्राचर्य डी. डी. चौधरी, फार्मसीचे राजेश ओसवाल, पंकज जाधव, एकविरा मुख्याध्यापक शहाजी लाखे, पोलिस पाटील संघटनेचे मावळ तालुकाध्यक्ष संजय जाधव, जिल्हा सरचिटणीस शहाजान इनामदार, विनोद बेंगळे, दिपाली कचरे, उज्वला अंभुरे, सीमा यादव, राजश्री कचरे, निता शिंदे हे उपस्थित होते.

या स्पर्धेचे आयोजन आणि संयोजन पोलिस निरिक्षक दीपक लुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक विशाल जांभळे, योगेश जगताप, संतोष वाडेकर यांच्यासह लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.