Lonavala : राजमाची किल्ल्यावर मशालोस्तोव साजरा

एमपीसी न्यूज -राजमाची किल्ल्यावर लोणावळ्यातील युवा आर्टिस्ट ग्रुप, राजमाची हेवन आणि राजमाची ग्रामस्थांच्या वतीनं मशालोस्तोव आणि दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला. यामुळे राजमाचीच्या मनोरंजन बालेकिल्ल्यावर असलेला पुरातन पडका वाडा शनिवारी रात्री मशाली आणि दिव्यांच्या प्रकाशाने उजळुन निघाला होता.

दिवाळी म्हणजे दिव्यांच्या सण, ज्याप्रमाणे दिवाळी सणामध्ये लोक मांगल्याचे प्रतीक म्हणून आपापल्या घराच्या प्रवेशद्वारावर आणि अंगणात तेलाचे दिवे लावतात. त्याचप्रमाणे धनत्रयोदशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या दरम्यान महाराष्ट्रात वेगवेगळ्या किल्ल्यांवर हौशी ट्रेकर्स आणि गडकिल्लेप्रेमी दिवे तसेच मशाली लावून दिवाळी सण साजरा करत असतात.

यंदा प्रथमच राजमाची किल्ल्यावर मशालोस्तोव साजरा करण्यात आला. सोबतच शेकडो दिवे लावण्यात आले. यावेळी विलास वरे, सुरेश जाणिरे, प्रताप उंबरे, गणेश उंबरे, सुरेश पाडाळे, विजय येवले, विशाल पाडाळे, प्रसाद पाडाळे, मयूर पाडाळे, ज्योती येवले, पौर्णिमा पाडाळे, स्वाती पाडाळे, सार्थक पोटफोडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

राजमाची किल्ल्यावर असलेल्या श्रीवर्धन आणि मनोरंजन या दोन बालेकिल्ल्यापैकी मनोरंजन बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर, बुरुजावर तसेच दारुखाण्याच्या इमारतीवर दीपोत्सवापूर्वी फुलांची सजावट करण्यात आली होती. युवा आर्टिस्टचे धनंजय होनंगी, विशाल केदारी, रुपेश विर, योगेश अंभोरे, योगेश पाळेकर, नितीन तावरे आदींनी पेटत्या मशाली हातात घेऊन देवीच्या गोंधळावर फेर धरत गोंधळ नृत्य सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.