Lonavala : सायंकाळच्या पुणे – लोणावळा लोककलची वेळ बदलावी, पुणे प्रवासी संघाची मागणी

एमपीसी न्यूज – पुण्याहून लोणावळ्याला जाणारी (Lonavala) सहा वाजून दोन मिनीटांनी सुटणारी लोकल ही गैरसोयीचे ठरत असून या लेकलची वेळ बदलावी अशी मागणी पुणे प्रवासी संघाने  रेल्वे च्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना केली आहे.

संघाने दिलेल्या निवेदनानुसार,  पुण्याहून लोणावळा कडे संध्याकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी निघणारी लोकल अनेक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जिकिरीची ठरत आहे. सरकारी ऑफिसेस हे संध्याकाळी 6 ते 6.15 ह्या वेळेत सुटतात.

त्यांनतर सहाची लोकल पकडणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. आणि त्यांना पुढील लोकलसाठी तब्बल एक तास वाट बघत ताटकळत उभे रहावे लागते. घरी पोहोचायला उशीर झाल्यामुळे त्यांची पुढील सगळी गणिते बिघडतात. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना घरी पोहोचून घरातील कामे करणे जिकीरीचे जाते.

त्यामुळे लोकलच्या वेळेत बदल करत ती साडे सहा किंवा पावणे सात करावी अशी लेखी विनंती पुणे प्रवासी संघाने रेल्वे च्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना केली आहे.

ह्या विषयी एमपीसी न्यूज शी बोलताना पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष ऍड. रितेश येवलेकर म्हणाले की, सहा वाजून दोन मिनीटांनी सुटणारी पुणे लोणावळा लोकल कर्मचाऱ्यांना पकडणे थोडो त्रासदायक होते. विशेषतः सरकारी कर्माचारी, कारण सरकारी कार्यालये ही सायंकाळी सहा किंवा सव्वा सहाला सुटतात, त्यामुळे त्यांना सहाची लोकल पकडणे शक्य होत नाही.

Maharashtra News : महसूल गुप्तचर विभागाने पकडल्या 24 कोटींच्या परदेशी सिगारेटी

त्यानंतर पुढील लोकलसाठी त्यांना रेल्वे स्थानकावर ताटकळत (Lonavala) थांबावे लागते. प्रवाश्यांनी हि तक्रार माझ्याकडे केली असता आम्ही त्वरीत  विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना लेखी अर्ज केला असून आशा आहे की रेल्वे प्रशासन प्रवाश्यांच्या या मागणीचा नक्की विचार करेल.

लोकल ही पुणे ते लोणावळा या मार्गावरील नागरिकांसाठी रोजच्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनली आहे. लोकलमुळे मावळातील अनेकजण पुण्यात नोकरी किंवा शिक्षणासाठी ये-जा करत असतात मात्र लोकलच्या वेळेत काही बदल करावेत अशी मागणी आता प्रवासी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.