Lonavala : संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या 199 जणांवर गुन्हा दाखल

लोणावळा शहर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 199 जणांवर लोणावळा शहर पोलिसांनी आतापर्यंत कारवाई केली आहे. शहरात आत्तापर्यंत विनाकारण फिरणार्‍या 125 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 118 दुचाकी व 6 चार चाकी वाहनांवर गुन्हे दाखल केले असून एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून लोणावळा शहर पोलिसांनी शहरातील सर्व चेक नाक्यांवर कडक बंदोबस्त तैनात करत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई मोहीम हाती घेतली आहे. लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्‍या मार्गदर्शनाखाली शहरात आत्तापर्यंत विनाकारण फिरणार्‍या 125 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 118 दुचाकी व 6 चार चाकी वाहनांवर गुन्हे दाखल केले असून एक चार चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

अत्यावश्यक सेवा वगळून पेट्रोलची विक्री केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरून समाजात तेढ करणे व शत्रुत्व भावना वाढेल अशी पोस्ट टाकल्याप्रकरणी एका युवकावर, तर पोलीस दलातील व्यक्तींमध्ये उद्देशपूर्वक द्वेष भावना निर्माण करणारी पोस्ट केल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र जुगार ॲक्ट प्रमाणे चार गुन्हे तर महाराष्ट्र प्रोव्हिबीशन अंतर्गत नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाने थैमान घातलेले असताना लोणावळा शहर आजही कोरोना मुक्त शहर राहीले आहे. लोणावळा शहराला कोरोनामुक्त ठेवण्याकरिता नागरिकांनी पोलीस व नगरपरिषद प्रशासनाला सहकार्य करावे. विनाकारण कोणीही घराबाहेर फिरू नये. भाजीपाला व किराणा घेण्याकरिता गर्दी करू नये. जिल्हा बंदीचे आदेश असल्याने कोणीही कंन्टेन्मेट भागात नातेवाईकांकडे जाऊ नये तसेच कोणा नातेवाईकांना आपल्याकडे बोलवू नये. मनोजकुमार यादव : पोलीस निरीक्षक, लोणावळा शहर पोलीस ठाणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.