Lonavala: लोणावळा शहराचा बारावीचा निकाल 92 टक्के

Lonavala city's overall HSC result 92%. (रायवुड व आँक्झिलियम शंभर टक्के निकाल)

एमपीसी न्यूज-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहिर झाला. यामध्ये लोणावळा शहराचा निकाल 91.60 टक्के इतका लागला आहे. (रायवुड व आँक्झिलियम शंभर टक्के निकाल)

शहरातून 1179 विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी 1080 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यामध्ये इंग्रजी माध्यमाची मुलींची शाळा असलेल्या आँक्झिलियम काँन्व्हेंट हायस्कूल व र‍ायवुड इंटरनॅशनल या दोन शाळाचा निकाल शंभर टक्के लागला.

डाॅन बाॅस्को शाळेचा निकाल 98.49 टक्के, डी पी मेहता ज्युनिअर काॅलेजचा निकाल 96.81 टक्के, आँल सेंट चर्चचा निकाल 87.50 टक्के तर लोणावळा महाविद्यालयाचा निकाल 43.22 टक्के लागला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.