Lonavala : आई एकविरा देवी गडावर गड संवर्धन व स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज – हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आई एकविरा देवी गडावर युवा सेना व भारतीय विद्यार्थी सेना यांच्या वतीने गड संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.यावेळी आई एकविरा देवी मंदिरासमोरील पटांगण ते पाय-यापर्यंत,वाहनतळाची स्वच्छता करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवा सेनेच्या वतीने गड संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. युवा सेना विस्तारक वैभव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्ला एकविरा देवी गडावर ही मोहीम राबविण्यात आली.

यावेळी तालुकाप्रमुख राजूभाऊ खांडभोर, संघटक अंकुश देशमुख, भाविसे संघटक धनंजय नवघणे, युवासेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे, समन्वयक विनायक हुलावळे, कुसगाव भाविसे विभाग संघटक राजेश वशिष्ठ, भाविसे वाकसई विभाग संघटक नितीन देशमुख, जांभूळ युवा सेना शाखा अधिकारी मयूर थोपटे, सोमनाथ मावकर, रूपेश येवले, मयूर गेजगे, विशाल घाडगे उपस्थित होते.

मावळ तालुक्यात किल्यांवर गड संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे असे युवा सेना मावळ विधानसभा चिटणीस विशाल हुलावळे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.