Lonavala : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाकिस्तानचा निषेध

एमपीसी न्यूज- जम्मू काश्मिर येथिल पुलवामा जिल्ह्यात राज्य राखीव दलाच्या सैनिक तुकडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना लोणावळा शहर काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत पाकिस्तानच्या विरोधात सरकारने कडक पाऊले उचलावीत अशी मागणी करण्यात आली.

यावेळी लोणावळा शहर काँग्रेसचे अध्यक्ष विलास बडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जीवन गायकवाड, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, प्रवक्ते व माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, बाळासाहेब पायगुडे, नगरसेविका पूजा गायकवाड, संध्य‍ा खंडेलवाल, आरोही तळेगावकर, सुर्वणा अकोलकर, निखिल कविश्वर, सुधीर शिर्के, संजय घोणे, जगंबहादूर बक्षी, नंदू हुल‍ावळे, मनोज लऊळकर, सनी पाळेकर, अमोल गायकवाड, सोमनाथ गायकवाड, पुष्पा भोकसे, नंदू घोणे, जितूभाई टेलर, साहेबराव टकले, अशोक मावकर, बाबुभाई शेख, सत्तारभाई, दत्ता दळवी, शिवराज मावकर आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी प‍किस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.